आज पुन्हा.....
आज पुन्हा फ़ुलेल
आठवणींचा रुतू
आज पुन्हा डॊळ्यासमोर
हासत सामोरा तू...
आज पुन्हा आठवेल
काही बोललेले...न बोललेले
निरोप घेताना
मन कसे ओलावलेले.......
GANDHREKHA
Tuesday, March 16, 2010
सुचावेसे वाटे.......
सुचावेसे वाटे ,असे काही गोड
शब्दांचेही कोड ,पुरवावे..!
शब्दांना परी, फ़ुटेना पालवी
प्रतिभेचे रान ,सुकलेले..!
शब्दकळा यावी , बहरुन ऎसी
कवितेचे फ़ूल , दर्वळावे..!
चांदण्यास यावा, मोग-याचा गंध
तैसा मनी छंद, सुगंधावा..!
एक तरी ओळ, अशी गे स्फ़ुरावी
जगण्य़ाचा अर्थ ,कळॊ यावा..!
उजळून जावा ,आतला अंधार
प्रकाशाचे झाड, बहरावे...!
सुचावेसे वाटे ,असे काही गोड
शब्दांचेही कोड ,पुरवावे..!
शब्दांना परी, फ़ुटेना पालवी
प्रतिभेचे रान ,सुकलेले..!
शब्दकळा यावी , बहरुन ऎसी
कवितेचे फ़ूल , दर्वळावे..!
चांदण्यास यावा, मोग-याचा गंध
तैसा मनी छंद, सुगंधावा..!
एक तरी ओळ, अशी गे स्फ़ुरावी
जगण्य़ाचा अर्थ ,कळॊ यावा..!
उजळून जावा ,आतला अंधार
प्रकाशाचे झाड, बहरावे...!
Subscribe to:
Posts (Atom)
